महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जून ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. चविष्ट पदार्थ खायला मिळतील. मधुर वाणीने सर्वांना खुश कराल. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
आर्थिक मानात सुधारणा होईल. हाती घेतलेले नवीन काम पूर्ण होईल. सर्वांवर तुमची उत्तम छाप पडेल. कौटुंबिक खर्च जपून करावा. मुलांवरील खर्च वाढू शकतो.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
कामात फार कोणावरही विसंबून राहू नका. कायद्याचे नियम डावलून चालणार नाही. स्त्री सौख्यात भर पडेल. क्षणिक आनंदात न्याहून निघाल. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
आंतरिक इच्छा पूर्ण होतील. काही नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. काही कामात अधिक ऊर्जा वापरावी लागेल. प्रेम संबंध अधिक घट्ट होतील. प्रवासात काळजी घ्यावी.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
काही समस्यांतून वेळीच मार्ग निघेल. जवळचे संबंध अधिक प्रभावीपणे हाताळाल. खोलवर चिंतनाची गरज भासू शकते. हातातील मिळकतीवर अधिक लक्ष केन्द्रित करावे. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
मानसिक आरोग्य उत्तम राहील. नवीन योजनांना खतपाणी घालावे. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. सहकार्यांशी सुसंवाद साधावा.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
अचानक धनलाभाची शक्यता. मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. नसते साहस अंगाशी येऊ शकते. आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
जोडीदाराशी मनाजोगा प्रेमालाप कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. भावंडांना मदत करावी लागेल. क्षुल्लक गोष्टींनी चिडू नका. नवीन कामात सतर्कता बाळगा.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
आपले उद्दीष्ट गाठण्याचा प्रयत्न करा. भागीदारीत चर्चेला महत्व द्यावे. जोडीदाराशी मतभेद वाढवू नका. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. कामातून अपेक्षित समाधान लाभेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
शारीरिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन कामात घाई करून चालणार नाही. प्रेम सौख्यात वाढ होईल. नवीन मैत्रीचे संबंध जोडले जातील. प्रवास जपून करावेत.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
मनातील व्याकूळता बाजूला सारावी लागेल. अनाठायी खर्च होण्याची शक्यता. घरातील वातावरण प्रसन्न राहील. बाग कामात गढून जाल. जोडीदाराशी क्षुल्लक खटके उडण्याची शक्यता.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
रागाला आवर घालावा लागेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. निसर्ग सौंदर्याकडे ओढ वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. फार हट्टीपणा करू नका.