महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जून ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
कुटुंबाचे उत्तम सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाहावा. तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नात यश येईल. कौटुंबिक सौख्यात वृद्धी होईल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. कौटुंबिक गोष्टींच्या बाबत आत्मपरिक्षण करावे. कामाच्या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. काही कामे तुमचा कस पाहतील.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
सामाजिक कामात सक्रिय राहाल. तुमच्यातील मित्र भावना वाढीस लागेल. प्रत्येक बाबतीत जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कष्टाला मागेपुढे पाहू नका. मानसिक ताण जाणवेल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
तुमच्या मनातील सर्व आकांक्षा पूर्ण होतील. व्यावसायिक आघाडीवर सक्रियता वाढेल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
आत्मविश्वासाने यश मिळवता येईल. प्रयत्नातून नवीन दिशा ठरवाल. वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. तरूणांशी मैत्री वाढेल. योजनेनुसार कामे पार पडतील.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. कामाच्या व्यापाने खचून जाऊ नका. भागीदाराशी संयमाने वागावे लागेल. हितशत्रू पासून सावध राहावे. धार्मिक कामात सहभाग घ्याल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
तुमच्या मनातील आनंद द्विगुणित होईल. पचनाच्या किरकोळ तक्रारी संभवतात. सहकार्यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. नोकरांना चलाखीने सांभाळावे लागेल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
जोखीम सावधगिरीने उचलावी. कोणाशीही वाटाघाटी करताना सावध राहावे. जोडीदाराविषयीच्या प्रेम सौख्याला बहार येईल. आपले मत व्यवस्थित पटवून द्यावे. भागीदारीतून चांगला नफा मिळवाल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. आर्थिक चढ-उतार संभवतात. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. केलेल्या कामातून आपण समाधानी असाल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. प्रेमप्रकरणाला चांगली दिशा मिळेल. प्रवासात कसलाही हलगर्जीपणा करू नका. इतरांवर फार विसंबून राहू नका. जुगाराची आवड जोपासाल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
मनातील शंकेचे निरसन करावे. अघळपघळ बोलणे टाळावे. घरातील टापटिपी बाबत दक्ष राहावे. मागचा पुढचा विचार न करता खर्च करू नये. नवीन जबाबदारीची जाणीव ठेवाल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
आततायीपणे निर्णय घेऊ नका. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. निसर्गसौंदर्याचा अनुभव घ्याल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल.