Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold-Silver Price: सोन्याचा भाव घसरला : पहा १० ग्रॅमची किंमत - Maharashtra 24

Gold-Silver Price: सोन्याचा भाव घसरला : पहा १० ग्रॅमची किंमत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जून ।। सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, २४ जून २०२५ रोजी, मंगळवारी भारतीय बाजारात दरवाढीनंतर सोन्याच्या दरामध्ये किंचिंत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २४ जून २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,४२० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९०,२१८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १०६,५६० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,०६६ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९०,०२६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९८,२१० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,०२६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,२१० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,०२६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,२१० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,०२६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,२१० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *