महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जून ।। वीज ग्राहकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी आहे. वीजदरात कपात करण्यात येणार असून लवकरच वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळणार आहे. पहिल्या वर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्यानं पुढील पाच वर्षांमध्ये वीज दरामध्ये तब्बल २६ टक्के कपात करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दिलीय.
‘राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
पूर्वीचा काळ पाहिला तर १० टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिलाय. अशा आशयाची पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी !
राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
साधारणत:…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 25, 2025
दरम्यान याचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्यांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. त्यांच्यासाठी १० टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला.असेही फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.