महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जून ।। लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे. जून महिना संपायला अवघे ४-५ दिवस उरले आहेत. त्यामुळे महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे पैसे जमा झाले की नाही याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहेत. (Ladki Bahin Yojana)
लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला फक्त काही सिंपल स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
ऑनलाइन प्रोसेस (Online Process)
सर्वात आधी तुम्हाला तुमच्या बँकेच्या किंवा पोस्टाच्या अॅपवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे.
अॅप ओपन झाल्यावर तुम्हाला चेक बॅलेंस असा ऑप्शन दिसेल.
त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला तुमच्या अकाउंटमधील बॅलेंस दिसेल. यावरुन तुम्हाला खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे समजेल.
याचसोबत तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन कोणत्या दिवशी पैसे डिपॉझिट झाले हेदेखील चेक करु शकतात. म्हणजे तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही हे समजेल.
ऑफलाइन पद्धत (Offline Mode)लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेही चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या ब्रँचमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला पासबुकवर एन्ट्री करुन घ्यावी लागेल. त्यावरुन खात्यात पैसे जमा झालेत की हे तुम्हाला कळेल.