Pimpri: उद्यापासून मालमत्ता करवसुलीसाठी राबविणार व्यापक मोहीम; पिंपरी-चिंचवड महापालिकेची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुन ।। मालमत्ता कराबाबत वारंवार आवाहन करून तसेच जप्तीची नोटीस देऊन देखील कर न भरणार्‍या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याची मोहीम महापालिकेकडून हाती घेतली जाणार आहे. 1 जुलैपासून मालमत्ता कर वसुलीची मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांनी चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत कर तत्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.


465.55 कोटींचे कर संकलन

दरम्यान, 1 एप्रिलपासून आत्तापर्यंत 18 विभागीय कार्यालयांमधून एकूण 465.55 कोटींचे करसंकलन झाले आहे. मालमत्ताधारकांसाठी 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा ऑनलाइन स्वरूपात केल्यास 10 टक्के सवलत देण्यात येत आहे. याशिवाय विविध करसवलती जाहीर केल्या आहेत. ही योजना संपल्यानंतर मात्र 1 जुलैपासून महापालिकेच्यावतीने करवसुलीसाठी व्यापक मोहीम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Latest Pimpri News)

Pimpri Municipal Corporation
Dhol Tasha Practice: ढोल-ताशा पथकांना सरावासाठी नाही जागा

निवासी मालमत्ताधारकांचे वाहन, टीव्ही, फ्रिजसारख्या वस्तू जप्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती करसंकलन आणि कर आकारणी विभागातून देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी आपला चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत कर भरून या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे धनादेशाद्वारे कराचा भरणा केला आणि तो वटला नाही अशा मालमत्ताधारकांना लवकरच जप्ती अधिपत्र पाठवून त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. ही जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मालमत्ताधारकांनी 30 जूनपूर्वी आपला मालमत्ता कर ऑनलाइन किंवा रोख स्वरूपात भरावा, असे कर संकलन आणि कर आकारणी विभागातून सांगण्यात आले आहे.

30 जूनपर्यंत सवलत घेतलेले मालमत्ताधारक

महिला मालमत्ताधारक : 15,151

माजी सैनिक : 3,790

दिव्यांग मालमत्ताधारक : 1,561

शौर्यपदधारक : 9

पर्यावरणपूरक मालमत्ता : 13,901

आगाऊ कर भरणारे : 38,917

ऑनलाईन आगाऊ भरणा करणारे : 2,86,840

करसंकलन विभागातील आकडेवारी (कोटीमध्ये)

वाकड : 57.95

थेरगाव : 43.29

चिखली : 35.67

कस्पटेवस्ती : 34.70

किवळे – 30.84

भोसरी – 30.79

चिंचवड – 30.29

पिंपरी वाघेरे – 30

मोशी – 27.03

सांगवी – 25.30

मनपा भवन – 24.56

आकुर्डी – 21.85

फुगेवाडी दापोडी

– 16.49

चर्‍होली – 14.35

निगडी प्राधिकरण – 11.96

तळवडे – 10.86

दिघी बोपखेल – 10.49

पिंपरी नगर – 3.71

महापालिकेचा मालमत्ता कर न भरणार्‍यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. वारंवार आवाहन करून देखील मालमत्ताकराची थकबाकी न भरणार्‍यांवर जप्ती सारखी कठोर कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. 1 जुलैपासून यासाठी व्यापक मोहीम हाती घेणार आहोत.

– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *