महाराष्ट्र 24 – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – निखिल कुर्डुकर – नांदेड – 28 ऑगस्ट –
साधेपणा, छोटेपणा म्हणजे न्यून नाही.
मोठेपणा म्हणजे प्रचंड भव्यता, आवाजी गोंधळ आणि पैशांची उधळण करणारा भपका नव्हे! कोरोना संकटामुळे कदाचित, आपल्याला हे उत्तम रीतीने कळले असेल.
यंदा घरोघरी आणि सार्वजनिक गणेशमूर्तीही छोट्या आणि त्यांची सजावट मिनिएचर, सुबक आणि नेटकी केलेली दिसते आहे. पण त्यामुळे गणेश भक्ती किंवा श्रद्धेत कोणतीही कमी आली असे दिसत नाही. म्हणजेच भव्य उधळण आणि आवाजी गोंधळ म्हणजे मोठेपणा नाही तर, छोटेपणा, साधेपणात एकप्रकारचे सौंदर्य आहेच. अतिशय सुंदर, देखण्या दिसताहेत या मूर्ती आणि सजावटी.
यातून आपण सारे नक्कीच काही शिकलो असू. एका दिखावटी अतिरेकाकडून आपण शांत-फुलफिल्ड भक्तीकडे वळलो असू. आता श्री गणेश आणि भक्त, यांमध्ये कोणतेही चित्त विचलित करणारे गोंधळ नाहीत. या प्रकारे चित्त जास्ती एकाग्र होईल असे मला वाटते. हे सारे, आपणा सर्वांना मनोमन पटायला हवे. श्री गणेशोत्सव, हा केवळ श्रद्धेचा, धार्मिक उत्सव नाही तर तो सामाजिक एकजुटीचा, कला क्रीडादी सांस्कृतिक बाबींना उत्तेजन देणारा जगातील एक दुर्मिळ उत्सव आहे, हे आपल्या लक्षात यायला हवे. या उत्सवातून स्थानिक संस्कृतीला उत्तेजन देणारे कार्य या पुढे वाढत जावे आणि बडेजाव, भपका, जो अनायासे कमी झाला आहे, जो पवित्र साधेपणा आला आहे, तो तसाच रहावा. ही कदाचित श्रींचीच इच्छाअसावी. ती आपल्या मनांत उतरावी ही सदिच्छा!
यंदा असाच साधेपणा श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री चक्रधर स्वामी नगर, यांच्यात दिसून येतो,दरवर्षी प्रमाणे विविधतेने गणेशोत्सवात देखावा न करता यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकट काळात मंडळाने अत्यंत साधेपणाने कोरोना काळात नागरिकांनी कोणत्या जबाबदारी घेतल्या पाहिजे या वर भर दिल आहे, श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाकडून जागो जागी जनजागृतीचे संदेश देणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत त्याच बरोबर मंडळा कडून कोरोना-रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या त्यात 260 च्या अधिक लोकांनी आपली तपासणी करून घेतली, त्याच बरोबर रक्तदान शिबीर हेल्थ चेकप इत्यादी नागरिकांच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या गोष्टीवर मंडळाकडून भर देण्यात आले आहे
,
विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात हा गणेशोत्सव होत असल्या कारणाने यंदाची मूर्ती पांडुरंगाच्या रुपात बसविण्यात आली आहे,श्री सिद्धिविनायक मंडळाचे अध्यक्ष निखिल कुर्डूकर यांनी प्राथमिक माहिती दिली आहे
सर्वांनी समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो याच अनुषंगाने आपण हे उपक्रम राबविले आहे असे पण त्यांनी सांगितले
श्री सिद्धिविनायक गणेश मंडळ
चक्रधर स्वामी नगर पवन नगर
भावसार चौक मालेगाव रोड नांदेड
अध्यक्ष निखिल कुर्डूकर,
उपाध्यक्ष अभिजित हळदेकर (कांबळे )
सदस्य,सागर लाडके,अश्विन शिंदे,अतुल पेदेवाड
शाम कौठेकर, नितीश पाटे,राहुल चौडेकर, गंगाधर अडे
मार्गदर्शक समिती, नगरसेवक दीपक पाटील ,बाबुराव जोगदंड, वैभव डहाळे समस्त जेष्ठ नागरिक

