पिंपरी कोर्टाचे नेहरूनगर येथील प्रशस्त इमारतीत स्थलांतर व मोशी येथील न्यायालयीन संकुल उभारण्याचे कामास गती

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ ऑगस्ट – पिंपरी (मोरवाडी) कोर्टाचे नेहरूनगर स्टेडियम समोरील सर्व्हे न. १०९/११०, सिटी स.न.६३६५/६६/६७,६३७०,६३७२ मधील पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे इमारतीमध्ये लवकरात लवकर स्थलांतर होणे कामी तसेच मोशी येथील सेक्टर १४ मध्ये नियोजित पिंपरी चिंचवड शहर परिसरासाठी अद्ययावत न्यायालयीन संकुलाचे लवकरात लवकर बांधकाम सुरू होणे कामी आज पिंपरी चिंचवड adv. बार असोसिएशन चे विद्यमान अध्यक्ष adv. दिनकर बारणे, माजी अध्यक्ष adv. संजय दातिर पाटील, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड. गोवा चे शिस्तपालन समितीचे मा. सदस्य adv. अतिश लांडगे, सचिव adv. हर्षद नढे पाटील, खजिनदार adv. सागर अडागळे इ. वकिलांचे शिष्टमंडळाने पिंपरी चे आमदार सन्माननीय श्री. आण्णा बनसोडे यांचे समवेत पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांची ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे भेट घेतली.

सदर भेटीमध्ये नेहरूनगर येथील इमारतीमध्ये कोर्ट कामासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फर्निचरचे काम लवकर सुरू करून सदर इमारतीमध्ये पिंपरी कोर्टाचे लवकरात लवकर स्थलांतर करणेकामी उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांना अध्यक्ष adv दिनकर बारणे यांनी निवेदन देऊन म्हणणे मांडले. आमदार अण्णा बनसोडे यांनी याबाबत प्रश्नाचे गांभीर्य सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री साहेबांनी तातडीने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर साहेब यांना सदर नेहरूनगर चे इमारतीमध्ये कोर्ट कामासाठी फर्निचरचे काम लवकर सुरू करणेबाबतचे आदेश दिले. कोवीड – १९ चे परिस्थितीत पिंपरी कोर्टाचे अपुरे जागेत कामकाज करताना सोशल व फिजिकल अंतराची मर्यादा पाळणे कठीण झाले आहे.मागच्याच आठवड्यात मा. ना. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या सोबत नेहरूनगर येथील जागेच्या भाड्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली होती.सदर बैठकीत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे विद्यमान सदस्य Adv . उमाप व adv .विठ्ठल आबा कोंडे देशमुख यांनी पिंपरी बार ची बाजू मा. न्यायमूर्ती यांच्या पुढे मांडली होती. मा.उच्च न्यायालय यांनी सदर इमारतीचे भाड्याच्या रकमेस मंजुरी दिली आहे .

मोशी येथील सेक्टर नंबर १४ मध्ये पिंपरी चिंचवड शहर परिसरासाठी नियोजित अद्ययावत कोर्टाचे व न्यायालयीन कर्मचारी निवास संकुलाचे इमारतीचे विकसन काम सुरू होणे कामी सुरुवातीला पन्नास लाखांचा निधी खात्यावर वर्ग करून लवकरात लवकर काम सुरू करणेबाबत दुसरे निवेदनही मा. उपमुख्यमंत्री साहेबांना देण्यात आले. त्यावर विधी व न्याय विभागाकडून तशी मागणी आलेनंतर लगेच निधी वर्ग करण्यात येईल असे ठोस आश्वासन मा. ना. अजितदादा पवार यांनी दिले.सदर निधी संदर्भात मा आमदार महेशदादा लांडगे यांनी नागपूर अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. तसेच मा. आमदार लक्ष्मण जगताप यांनी बजेट मध्ये तरतुदी पाठपुरावा केला होता..

सदर भेटीनंतर पिंपरी कोर्टाचे नेहरूनगर येथील इमारतीत लवकरच स्थलांतर होऊन शहराची न्याय व्यवस्था बळकट होणेसाठी आणखी कनिष्ठस्तर, वरिष्ठतर, सेशन कोर्ट , मोटर वाहन कोर्ट इ. न्यायालये पिंपरी चिंचवड शहरात लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असा आशावाद अध्यक्ष adv. दिनकर बारणे व शिष्ट मंडळाने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *