महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। हिंदी सक्तीविरोधात तीव्र पडसाद उमटले. सरकारने हिंदीबद्दलचे निर्णय रद्द केले. याच मुद्द्यावर बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह काही महापुरूषांची नावे घेत असे विधान केले, ज्यावर वादाची ठिणगी पडली आहे. विरोधी पक्षाने यावरून संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली.
माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, “जगामध्ये शिकायचं असेल, तर सगळ्या भाषा अवगत केल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराजा बहुभाषिक होते. ताराराणी, येसूबाई, जिजाऊ मा साहेब या सगळ्या अनेक भाषा शिकल्या, हिंदी भाषेसह ते लोक मूर्ख होते का?”, असे विधान संजय गायकवाडांनी केले.
“यावर वाद करून मताचे राजकारण करणे चुकीचे आहे. मी तर थेट बोललो, अनेक ठिकाणी बोललो. जर पाकिस्तानचा दहशतवाद रोखायचा असेल, तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे”, असे ते म्हणाले.