महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
चैनीच्या वस्तु खरेदी कराल. ओळखीच्या लोकांकडून मदत मिळेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल. थोडी काटकसर करावी लागेल. सामाजिक कामात मदत कराल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
चांगले वैवाहिक सौख्य लाभेल. नवीन मित्र जोडले जातील. सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. खूप दिवसांपासूनची हौस भागवता येईल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. क्षणिक आनंदावर समाधान मानावे लागेल. इच्छेविरूद्ध काही गोष्टी कराव्या लागू शकतात. विचार योग्य प्रकारे मांडावेत.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
तुमच्यातील सुप्त गुण इतरांच्या नजरेत येतील. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. सजावटीवर अधिक भर द्याल. घरात टापटीप ठेवाल. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. कलेला चांगले पोषक वातावरण लाभेल. काही महत्त्वाच्या कामांना खीळ बसू शकते. स्वत:च्या फायद्याचा आधी विचार कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
मनाच्या चंचलतेला आवर घालावी. एकसूत्री विचार करून चालणार नाही. कमी श्रमातून पैसे कमवाल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत एकोप्याने कामे कराल. संपर्कातील लोकांशी घनिष्ठ संबंध निर्माण होतील. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. चारचौघात तुमची वाहवा केली जाईल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
आपले मत इतरांना नीट समजावून सांगावे. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. हाताखालील लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल. आळस झटकून टाकावा लागेल. नातेवाईक मदतीला उभे राहतील.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
तुमच्यातील कलागुण इतरांच्या नजरेत येतील. छंद जोपासायला अधिक वेळ द्याल. मित्र परिवार गोळा कराल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. निसर्ग सौंदर्यात रमून जाल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
दिवस समाधानात जाईल. नवीन गोष्टीत अधिक रुची दाखवाल. घरगुती कामे वेळेत पूर्ण होतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आवडत्या वस्तु खरेदी केल्या जातील.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
वाचनाची आवड जोपासता येईल. इतरांचे मनापासून कौतुक कराल. जवळच्या लोकांच्या आनंदात आनंद मानाल. चांगली कल्पना शक्ति लाभेल. प्रवासाची हौस भागवाल.