महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। यावर्षी मे महिन्यापासून पावसाने राज्यात जोर धरला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र दिसत होत मात्र कालपासून पावसाने राज्यात जोर धरला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून राज्यात ५ ते ९ जुलै दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील चार दिवस हाय अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा दिला आहे.
पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण ? जाणून घ्या
५ जुलै रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर तसेच नाशिक ,पुणे, सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तर मुंबई,नंदुरबार, धुळे ,जळगाव,छत्रपती संभाजीनगर ,जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ६ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि कोल्हापूर, सातारा, नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
बीड ,नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार,वर्धा ,नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ७ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, रायगड,भंडारा गोंदिया,नाशिक व साताऱ्याचा घाटमाथा या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे ,पालघर, नाशिक, नंदुरबार ,धुळे ,जळगाव ,छत्रपती संभाजीनगर, जालना ,परभणी, हिंगोली, नांदेड,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे यलो अलर्ट जरी केला आहे.
८ जुलै रोजी रत्नागिरी, गोंदिया व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, रायगड सिंधुदुर्ग नागपूर ,भंडारा, चंद्रपूर ,गडचिरोली,तसेच कोल्हापूर व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट आहे. ९ जुलै रोजी तळ कोकणासह पुढे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरील पावसाचा येलो अलर्ट,नागपूर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचाही समावेश आहे.