महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुलै ।। इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने (England vs India, 2nd Test) तब्बल 336 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलची (Shubhman Gill) सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. शुभमन गिलने पहिल्या डावात 269 धावा आणि दुसऱ्या डावात 161 धावा केल्या.
भारतीय क्रिकेट संघाने तब्बल 58 वर्षांनंतर एजबेस्टन मैदानावर इंग्लंडचा पराभव केला. या विजयासह भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025-26) मध्ये विजयाचं खातं उघडलं आहे. भारत WTC च्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दोन सामन्यांमधील पहिल्या विजयासह, भारताच्या खात्यात 12 गुण झाले आहेत आणि गुणांची टक्केवारी 50 आहे. त्याचवेळी इंग्लंड 12 गुण आणि 50 गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. सध्या, ऑस्ट्रेलिया 12 गुण आणि 100 गुणांच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे तर श्रीलंका आणि बांगलादेश अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
Two wins to begin Australia's #WTC27 campaign 👏
Full standings 📝 https://t.co/TJt9cbipMe pic.twitter.com/QNCxofzFxE
— ICC (@ICC) July 7, 2025