महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जुलै ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
आपल्या मर्जी प्रमाणे दिवस घालवा. सामुदायिक गोष्टींवर भाष्य करू नका. कौटुंबिक सौख्य जपाल. मुलांची बाजू समजून घ्यावी. जन संपर्कातून काम होईल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आवडत्या गोष्टी तुमच्या समोर हजर राहतील. मौजमजेला प्राधान्य द्याल. मनातील काळजी दूर साराल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
मानसिक दोलायमानता जाणवेल. स्थिर विचार करावेत. कामात अति घाई करून चालणार नाही. क्षणिक आनंद उपभोगाल. शारीरिक थकव्या बरोबर वैचारिक थकवा जाणवेल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
ऐषारामाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. दिवस आळसात घालवाल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक कामातील कागदपत्रे व्यवस्थित हाताळा. कामसौख्याचा आनंद घ्याल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
अडचणीतून मार्ग निघेल. सामाजिक कामात मदतीचा हात पुढे कराल. सर्वांशी सहृदयतेने वागाल. तुमच्या मनाची विशालता दिसून येईल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर संभवते.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
कामात विचारपूर्वक पाऊले टाकावीत. भावंडांशी दुराग्रही वागू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. भागीदाराशी सलोखा वाढवावा लागेल. कामातील अडचण दूर होईल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. पोटाच्या समस्या जाणवतील. छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल. हातातील कामात यश येईल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
मानसिक अस्वस्थता जाणवेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. नवीन ओळखी होतील. चुकीच्या संगतीत अडकू नका. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
अचानक धनलाभाची शक्यता. आवडते साहित्य वाचायला मिळेल. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांची बाजू समजून घ्यावी. जुन्या कामात वेळ जाईल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
केलेल्या कामातून समाधान मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. अगदीच गरज असेल तरच प्रवास करावा. चालू कामास गतीमानता येईल. घरातील कामात समाधानी असाल
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल. उगाच कोणाशीही वाद वाढवू नका. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. जवळचा प्रवास करावा लागेल. दिवस मजेत घालवाल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
दिवस कटकटीचा जाऊ शकतो. गोष्टी शांतपणे जाणून घ्याव्यात. रागावर नियंत्रण ठेवावे. घाई-घाईने कोणतीही कृती करायला जाऊ नये. करमणुकीचा आनंद घ्याल.