महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ जुलै ।। दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डर याने झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात काल ३६७ धावांवर खेळत असताना डाव घोषित केला. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याचा ४०० धावांचा विक्रम मोडण्याची नामी संधी मुल्डरसाठी चालून आली होती. पण, त्याने ४०० धावा पूर्ण करण्यासाठी ३३ धावा शिल्लक असताना डाव घोषित केला. त्याने असे काल केले? त्याच्या उत्तराने संपूर्ण क्रिकेटविश्वाचं मन जिंकलं.
मुल्डरने ३३४ चेंडूंत ४९ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ३६७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर आफ्रिकेने पहिला डाव ५ बाद ६२६ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात यजमानांचा पहिला डाव १७० धावांवर गुंडाळला गेला. प्रेनेलान सुब्रायेन याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. फॉलोऑन स्वीकारून मैदानावर आलेल्या झिम्बाब्वेला दुसऱ्या डावात ५१ धावांवर पहिला धक्का बसला आहे.
माझ्या नशिबात काय आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही, पण ब्रायन लाराचा कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम जपला पाहिजे. त्याचा खेळ पाहून लहानाचा मोठा झालोय. ब्रायन लारा दिग्गज फलंदाज आहे. यापुढेही जेव्हा मी या विक्रमाच्या जवळपास पोहोचेने, तेव्हाही मी पुन्हा असेच करीन.
– वियान मुल्डर
ब्रायन लाराचे दोन विक्रम बचावले…
तिसऱ्या क्रमांकावर खेळताना एका डावात सर्वाधिक धावसंख्या ( कसोटी)
४००* – ब्रायन लारा विरुद्ध इंग्लंड,सेंट जॉन्स, २००४
३७५ – ब्रायन लारा विरुद्ध इंग्लंड, सेंट जॉन्स, १९९४
३६७* – वियान मुल्डर विरुद्ध झिम्बाब्वे, बुलावायो, २०२५
३६५* – गॅरी सोबर्स विरुद्ध पाकिस्तान, किंग्स्टन, १९५८
३३६* – वॉली हॅमंड विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड, १९३३
१००+ फलंदाजी स्ट्राईक रेटने कसोटी डावात सर्वाधिक धावा
३६७* (३३४) – वियान मुल्डर विरुद्ध झिम्बाब्वे, बुलावायो, २०२५ (SR: १०९.८८)
३१९ (३०४) – वीरेंद्र सेहवाग विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चेन्नई, २००८ (SR: १०४.९३)
२९३ (२५४) – वीरेंद्र सेहवाग विरुद्ध श्रीलंका, ब्रेबॉर्न, २००९ (SR: ११५.३५)
२५८ (१९८) – बेन स्टोक्स विरुद्ध झिम्बाब्वे, केपटाऊन (SR: १३०.३०)
२५४ (२४७) – वीरेंद्र सेहवाग विरुद्ध पाकिस्तान, लाहोर, २००६ (SR: १०२.८३)
एका कसोटी डावात प्रत्येक संघासाठी सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या
वेस्ट इंडिजसाठी – ब्रायन लारा – ४००* विरुद्ध इंग्लंड, २००४
ऑस्ट्रेलियासाठी – मॅथ्यू हेडन- ३८० विरुद्ध झिम्बाब्वे, २००३
श्रीलंकेसाठी – महेला जयवर्धने – ३७४ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २००६
दक्षिण आफ्रिकेसाठी – वियान मुल्डर – ३६७* विरुद्ध झिम्बाब्वे, २०२५
इंग्लंडसाठी – लिओनार्ड हटन – ३६४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९३८
पाकिस्तानसाठी – हनीफ मोहम्मद – ३३७ विरुद्ध वेस्ट इंडिज, १९५८
भारतासाठी – वीरेंद्र सेहवाग – ३१९ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २००८
न्यूझीलंडसाठी – ब्रेंडन मॅक्युलम – ३०२ विरुद्ध भारत, २०१४
झिम्बाब्वेसाठी – डेव्ह हॉटन – २६६ विरुद्ध श्रीलंका, १९९४
अफगाणिस्तानसाठी – हशमतुल्लाह शाहिदी – २४६ विरुद्ध झिम्बाब्वे, २०२४
बांगलादेशसाठी – मुशफिकुर रहीम – २१९* विरुद्ध झिम्बाब्वे, २०१८
आयर्लंडसाठी – केविन ओ’ब्रायन – ११८ विरुद्ध पाकिस्तान, २०१८