Ajit Pawar: ‘जे आडवं येईल त्याला उचला; त्याशिवाय हे होणार नाही’, आयटी पार्क हिंजवडीत समस्यांवरून…..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुलै ।। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पहाटे सहापासून आयटी पार्क हिंजवडीत विविध समस्या सोडवण्यासाठी दौऱ्यावर आहेत, रस्त्याच्या आणि वाहतूक कोंडी समस्येसाठी थेट आता अजित पवारच रस्त्यावर उतरले आहेत, सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा, त्यांना उचला, असा स्पष्ट आदेश पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला अजित पवारांनी दिला आहे, रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

अधिकाऱ्यांनी सरकारी रस्ता अडवणाऱ्या लोकांबाबत अजित पवारांना सांगितलं. त्यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सांगितलं, आता तुम्ही कोणाचंही ऐकू नका. चांगलं काम करा. सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा, जे आडवं येईल त्याला उचला. त्याशिवाय हे होणार नाही. ज्याच्या मालकीची जागा जात असेल त्याला मोबदला देऊ त्याचं नुकसान करायचं आपलं काही काम नाही. जे काय करायचंय ते करून घ्या. पण आपल्या मालकीचा रस्ता, आपल्या डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याकरता परत पैसे देण्याचा काही संबंध येत नाही. तुम्ही त्यात पाठपुरावा करा, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

रस्ते छोटे ठेवू नका, मोठेच्या मोठे रस्ते करा. फोर लेन रस्ते करा, अशा सुचनाही अजित पवारांनी दिल्या आहेत. तर आयटी पार्क हिंजवडीतील इतर विविध समस्या सोडवण्यासाठी अजित पवार दौऱ्यावर आहेत, रस्त्याच्या आणि वाहतूक कोंडी समस्येसाठी थेट आता अजित पवारच रस्त्यावर उतरले आहेत, या प्रकरणी अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आले आहेत, या कामामध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा, त्यांना उचला, असा स्पष्ट आदेश पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला अजित पवारांनी दिला आहे, रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क आणि आसपासच्या परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पहाटे सहा वाजताच दौऱ्यावर उतरले. त्यांनी थेट रस्त्यावर येऊन रस्त्यावरील अडथळे, अनधिकृत अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थेच्या अडचणींचा आढावा घेतला.दौर्‍यावेळी पीएमआरडीए आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांना सांगितले की, काही स्थानिक नागरिक सरकारी रस्त्यांवर अडथळा निर्माण करीत आहेत. यावर अजित पवारांनी तीव्र प्रतिक्रिया देत अधिकाऱ्यांना ठामपणे सांगितले की,”आता तुम्ही कोणाचंही ऐकू नका. चांगलं काम करा.”सरकारी रस्त्यावर अडथळा आणणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय दंड विधानाच्या कलम 353 नुसार सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करा. जे आडवं येईल त्याला उचला. त्याशिवाय हे होणार नाही. ज्याच्या खाजगी मालकीची जागा रस्त्यामुळे प्रभावित होत असेल, त्याला शासनाकडून मोबदला दिला जाईल. त्यांचं नुकसान करायचं आमचं कोणतंच उद्दिष्ट नाही. पण जो रस्ता शासकीय मालकीचा आहे, त्यासाठी परत कुणालाही पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही. प्रशासनाने त्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *