महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुलै ।। ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) कॉमेडी शो प्रेक्षकांचे अनेक वर्षांपासून मनोरंजन करत आहे. त्यांना खळखळवून हसवत आहे. या शोमुळे यातील कलाकारांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. जेठालाल, टपू आणि दयाबेन ही पात्र प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहे. सध्या जेठालालचे पात्र खूप गाजत आहे. हे पात्र अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.
दिलीप जोशी (Dilip Joshi) सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत त्यांनी वजन कमी करण्याचा किस्सा सांगितला आहे. दिलीप जोशी यांनी 45 दिवसांत 16 किलो वजन कमी (Weight Loss) केल होते. तेही कोणतेही डाएट न करता. त्यांच्या फिटनेसचे रहस्य जाणून घेऊयात.
दिलीप जोशी यांनी मुलाखतीत सांगितल्यानुसार, त्यांनी 1992मध्ये ‘हुनहुनशी हुनशिलाल’ या चित्रपटासाठी वजन कमी केले. या चित्रपटात त्यांना शास्त्रज्ञाची भूमिका साकारली. त्यासाठी त्यांना वजन कमी करण्यास सांगण्यात आले होते. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये दिलीप जोशी यांनी फाफडा आणि जलेबी खाणाऱ्या जेठालालची भूमिका साकारली आहे.
फिटनेस सीक्रेट काय?
दिलीप जोशी दररोज 45 मिनिटांचा जॉगिंग करायचे. असे त्यांनी जवळपास दीड महिना चालू ठेवले. दिलीप जोशी मरीन ड्राइव्हला धावायला जायचे. त्यांच्या मते धावणे फक्त व्यायाम नसून एक छान अनुभव आहे. ज्यामुळे महागड्या फिटनेस ट्रेनर आणि कोणत्याही डाएटशिवाय दिलीप जोशी यांनी वजन कमी केले. धावल्यामुळे शरीरातील जास्त कॅलरीज बर्न होतात. क्रॅश डाएटमुळे कधीतरी आरोग्याला धोका पोहचतो.
