Awhad vs Padalkar : पडळकरांनी कानात काहीतरी सांगितलं अन् देशमुखांवर सगळे तुटून पडले, आव्हाडांनी दाखवला हल्ल्यापूर्वीचा व्हिडिओ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। विधिमंडळाचा परिसर गुरूवारी आखाडा झाला, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी हाणामारीच्या आधीचा व्हिडिओ पोस्ट करत खळबळ उडवून दिले आहे. हाणामारीच्या वेळी गोपीचंद पडळकर घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला कानात काहीतर सांगितलं अने ते सर्वजण देशमुख यांच्यावर तुटून पडल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

विधानभवनातील लॉबीत झालेल्या गोंधळानंतर एक महत्त्वाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत पडळकरही दिसतायत…हाणामारी सुरू झाली यावेळी पडळकरांच्या पीएनं पडळकरांचा हात ओढला…आणि बाकीचे सगळे पुढे धावत गेले. हाणामारी घडण्यापूर्वीच पडळकर तेथे उपस्थित होते का? या व्हिडीओत काय दिसतंय? आणि यावर राजकीय प्रतिक्रिया काय आहेत? पाहा व्हिडिओ.

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यामध्ये विधिमंडळाच्या लॉबीबाहेरील काचेच्या प्रवेशद्वाराजवळ गोपीचंद पडळकर आपल्या कार्यकर्त्यांशी खासगीत काहीतरी बोलताना दिसत आहेत. पडळकर यांनी कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्या असाव्यात, असा संशय या व्हिडिओतून व्यक्त होतेय. पडळकरांशी बोलणं झाल्यानंतर, ऋषिकेश टकले यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते काचेच्या प्रवेशद्वारातून आत शिरले आणि थेट विधिमंडळाच्या लॉबीत उभे असलेले नितीन देशमुख यांच्यावर हल्ला केला.

व्हायल व्हिडीओनुसार, गोपिचंद पडळकर यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख लॉबीतून बाहेर येण्याच्या प्रतीक्षेत होते. देशमुख प्रवेशद्वारातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला. या झटापटीदरम्यान, नितीन देशमुख आणि हल्लेखोर कार्यकर्ते पुन्हा लॉबीच्या आत ढकलले गेले. यावेळी गोपीचंद पडळकर काचेच्या बाहेरून आत घडणाऱ्या घटनांचा आढावा घेत असल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसते.

या प्रकरणानंतर गोपीचंद पडळकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पडळकर यांनी घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी विधानसभेच्या परिसरात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले आणि याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना सर्व प्रकरणाबाबत दिलगिरी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *