![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. मात्र गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतो आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उद्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण गोवा विभागात १८ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर १९ ते २२ जुलै दरम्यान पावसाचा जोर हा कमी होणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात १८ आणि १९ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून त्यानंतर पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे.
मराठवाड्यात देखील १८ आणि १९ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे. तसेच विदर्भात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जून आणि जुलै महिन्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, तर मराठवाड्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. यंदा राज्यात मे महिन्यात पाऊस दाखल झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.पण मराठवाड्यात मात्र सरासरी पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. दरम्यान राज्यात पावसाचा लपंडावाचा खेळ असाच सुरु राहिला तर नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
