Tatkal Passport: विदेशात जायचंय, उद्या तत्काळ पासपोर्ट मोहीम; ‘ही’ कागदपत्रे लागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने येथील प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयाच्या वतीने शनिवारी (दि. 19 जुलै) तत्काळ विशेष पासपोर्ट मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक पारपत्र कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकारातून पासपोर्ट अपॉइंटमेंट लवकर उपलब्ध करून देण्यासाठी 19 जुलै रोजी पुणे येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) येथे तत्काळ अपॉइंटमेंट मोहीम राबवली जाणार आहे. बहुतांश अर्जदार निकषांमध्ये अपयशी ठरतात. त्यामुळे अर्ज यशस्वीरीत्या सादर करू शकत नाहीत. अर्जदारांना काळजीपूर्वक वाचण्याची आणि अपॉइंटमेंटच्या दिवशी संभाव्य समस्या टाळण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. (Latest Pune News)

… अशी करा कागदपत्रांची पूर्तता

आधार क्रमांकाचा उल्लेख असलेला क्यूआर कोड जन्म प्रमाणपत्र

इयत्ता 10 वी (मॅट्रिक्युलेशन) उत्तीर्ण प्रमाणपत्र

स्कॅन करण्यायोग्य क्यूआर कोडसह नवीनतम ई-आधार

होलोग्रामसह पॅन कार्ड

होलोग्राम स्टिकरसह मतदार ओळखपत्र

ड्रायव्हिंग लायसन्स

विवाह प्रमाणपत्र किंवा संयुक्त फोटो असलेले घोषणापत्र (परिशिष्ट मगफ), पती-पत्नी दोघांनीही स्वाक्षरी केलेले, जोडप्याचे पासपोर्ट फोटो, पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स (पासपोर्ट नसल्यास)

योग्यरीत्या भरलेले आणि स्वाक्षरी केलेले परिशिष्ट मऊफ (म्हणजे दोन्ही पालकांची संमती)

दोन्ही पालकांचे पासपोर्ट

…हे लक्षात ठेवा

स्मार्ट ओळखपत्र स्वीकारले जात नाही.

आधार हा जन्मतारखेचा पुरावा नाही.

स्मार्ट ओळखपत्र म्हणजे खासगी संस्था, स्टेशनरी दुकानांनी प्लास्टिकवर छापलेले आधार, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र स्वीकारले जात नाही.

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी एमआधार आणि डिजिलॉकर मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड करा.

जन्म प्रमाणपत्र, आधार, इयत्ता 10 वी (मॅट्रिक्युलेशन) उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे मिळवा.

क्यूआर कोड स्कॅन करा : पासपोर्ट कार्यालयाला भेट देण्यापूर्वी आधार कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करा.

डिजिलॉकर आणि एमआधार मोबाईल अ‍ॅप्सच्या स्कॅनर सुविधेचा वापर करून जन्म प्रमाणपत्र, ई-आधार इत्यादी कागदपत्रे आणि या आधार कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करता येईल याची खात्री करा.

कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी डिजिलॉकरने जारी केलेली (अपलोड न केलेली) कागदपत्रे केवळ तेव्हाच स्वीकारली जातील जेव्हा ते ऑनलाइन पासपोर्ट अर्ज सबमिशनच्या वेळी आधीच शेअर केली असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *