मेटाचे नवे फिचर लाँच, एआयने बनवता येणार फोटो

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। मेटाने हिंदुस्थानात आपले नवीन एआय फिचर इमेजिन मी लाँच केले आहे. हे फिचर आतापर्यंत केवळ अमेरिका आणि काही निवडक देशात उपलब्ध करण्यात आले होते. परंतु, आता हिंदुस्थानातील यूजर्ससाठी हे फिचल लाँच करण्यात आले आहे. या फिचरमुळे यूजर्सला एआयचा वापर करून वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो बनवता येतील. हे फिचर मेटा एआय इंटरफेस अंतर्गत सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून मोफत आहे. ज्या यूजर्सला क्रिएटिविटी करणे पसंत आहे. त्यांच्यासाठी हे फिचर खूपच फायदेशीर ठरू शकते. एआय अंतर्गत यूजर्सला वेगवेगळ्या चेहऱ्यात फोटो काढता येईल. यूजर्सला केवळ एक डिस्क्रिप्शन द्यावे लागेल. डिस्क्रिप्शन जेवढे बरोबर असेल तेवढे फोटो चांगले बनतील. यूजर्सना जसा फोटो हवा आहे, तसाच फोटो एआयच्या मदतीने मिळेल. मेटाचे हे फिचर एआय अॅप, इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *