महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -संजीवकुमार गायकवाड- दि. ३१ ऑगस्ट – नांदेड – येथील प्रसिद्ध गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर साहेब परिक्रमा परिसरात नवनिमित्त श्री अखंड पाठ साहेब केबिनचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी सहाय्यक जत्थेदार रामसिंघजी गुरुद्वारा बोर्डाचे सचिव स. रवींद्रसिंघ बंगई. माजी सदस्य सुरिंदरसिंघ. बोर्डाचे अधिक्षक स. गुरुवीन्द्रर सिंघ वाधवा, कनिष्ठअधीक्षक स. रवींद्रसिंघ कपूर आदि मान्य वरच्या उपस्तिथीत होते अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरुवीन्द वाधवा यांनी प्रसिद्धी पत्रका मार्फत दिली आहे.
यावेळी मोठया उत्साहाच्या वातावरणात श्री अखंड पाठ साहिब केबिन चे तख्त परिसरात विस्तारित परिक्रमा क्षेत्रात नव्याने उभाकरण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या नव्या कैबिनची सेवा संत बाबा बलविंदरसिंघ जी कारसेवा वाले यांच्या माद्यमातून पूर्ण करण्यात आली असून तख्त परिक्रमा परिसरात श्री अखंड पाठ आयोजनासाठी वर्षभरात हजारो भाविक इच्छुक असतात भक्तांच्या मागणी लक्षात घेता गुरुद्वारा बोर्डाने हे नवीन केबिन तयार करण्यात आली आहे. ही केबिन सर्व सुविधा संपन्न असल्याची माहिती गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. गुरुवीन्दर सिंघ वाधवा यांनी प्रसिद्ध परिपत्रका मार्फत दिली आहे.