महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -निखिल कुर्डूकर – दि. ३१ ऑगस्ट – नांदेड – नांदेड येथील चक्रधारस्वामी नगर मधील रहिवाशी वैभव सूर्यकांत डहाळे यांच्या परिवारात दरवर्षी मोठ्या उत्सवात गौरी पूजन साकारले जाते या वर्षी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परिवाराने अतिशय संवेदनशील असा सामाजिक संदेश देणारा देखावा त्यांनी साकारला,

त्यात पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार यांचा मान ठेवा , मास्क, वापरा गर्दी टाळा असे अनेक समाज उपयोगी संदेश त्यांनी या माध्यमातून दिले, सोबतच राम मंदिर भूमिपूजन सोहळा प्रसंग देखील देखाव्यात त्यांनी उतरवला आहे …डहाळे परिवार दरवर्षी असे सामाजिक भान जपत गौरी पूजन साजरा करत असत मागील वर्षी देखील या परिवाराने स्वच्छ भारत अभियान व त्या आधी वर्षी बेटी बचाव हा देखावा सादर केला होता , या अश्या देखाव्यातून नेहमी डहाळे परिवाराच्या गौरी लक्ष्मी लक्षवेधक ठरत असतात