Horoscope Today दि. २७ जुलै; आज भागीदारीत फार अवलंबून राहू नका….… ; पहा बारा राशींचं भविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जुलै ।।

मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
लिखाण करण्यास चांगला दिवस. नवीन तांत्रिक बाबींची जाणीव करून घ्यावी. मानसिक प्राबल्य वाढवावे लागेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. अनाठायी घराबाहेर पडू नका.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुमची गरज भागवली जाईल. मनावर फार ताण घेऊ नका. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. घरातील सर्वांशी मिळून-मिसळून वागावे.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
कामाचा फार बोभाटा करू नका. हाताखालील लोक सहाय्यक ठरतील. प्रलोभनापासून दूर राहावे. लपवाछपवीची कामे करू नका. घरगुती खर्च वाढू शकतो.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
चैन करण्याकडे अधिक कल राहील. मुलांशी हितगुज कराल. भागीदारीत फार अवलंबून राहू नका. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
व्यायामाला कंटाळा करू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. नवीन उर्जेने कामे तडीस न्याल. जवळचे मित्र भेटण्याची शक्यता.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. वादावादीच्या मुद्दयात सहभाग होऊ नका. वचन करण्यावर भर द्या. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. वरिष्ठांच्या कडून कौतुकास पात्र व्हाल.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
विसंवादाला थारा देऊ नका. मनात कोणतेही आधी बाळगू नका. जुनी येणी प्राप्त होतील. प्रयत्नांना यश मिळेल. कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
अंगीभूत कलेला वाव द्यावा. केलेली धावपळ सार्थकी लागेल. कामे हातावेगळी केल्याचा आनंद लाभेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. वडीलधार्‍यांचा मान राखावा.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. घरगुती वातावरण चिघळू देऊ नका. संयमाने कामे कराल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
गरज असल्यासच बाहेर पडा. जुनी देणी भागवली जातील. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेम सौख्यात वाढ होईल.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
औद्योगिक स्थिरता लाभेल. घरात काही जुजबी बदल कराल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. दिवस आनंददायी ठरेल. कोणावरही फार विसंबून राहू नका.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
तुमच्या ज्ञानात भर पडेल. निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल. बर्‍याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील. वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल. बोलण्यात गोडवा ठेवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *