महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै ।। परदेशातील नोकरीचा अनेकांनाच हेवा वाटतो. परदेशी चलनामध्ये मिळणारा पगार, कर्मचाऱ्यांना तेथील कार्यालयांमध्ये मिळणाऱ्या सुविधा या आणि तेथील जीवनशैली या अनेक कारणांमुळ बहुतांश भारतीय परदेशात आणि त्यातही (America) अमेरिकेत जाऊन बड्या Tech कंपन्यांमध्ये काम करण्याची स्वप्न पाहतात. आता मात्र या स्वप्नांना विसरण्याची वेळ आली आहे आणि यास कारण ठरत आहे ती म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांची कठोर भूमिका.
भारतीय कर्मचाऱ्यांना अमेरिकेत नो एन्ट्री?
ट्रम्प यांनी अमेरिकेत असणाऱ्या जगातील काही मोठ्या टेक कंपन्यांना स्पष्ट सूचना करत भारतासह इतर कोणत्याही देशांतून कर्मचारी नियुक्त करण्यात सक्त मनाई केली आहे. यामध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटासारख्या बड्या कंपन्यांचाही समावेश आहे. बुधवारी वॉशिंग्टन इथं आयोजित AI Summit दरम्यान ट्रम्प यांनी ही कठोर भूमिका मांडत अमेरिकी नागरिकांच्या कौशल्याला वाव देण्याचा आग्रही सूर या कंपन्यांना उद्देशून आळवला.
जगातील मोठ्या टेक कंपन्यांनवर भारतीय, मग आता त्यांचं काय?
आतापर्यंत जगभरात नावाजल्या केलेल्या अनेक मोठ्या टेक कंपन्यांमध्ये उच्च पदांवर भारतीय वंशांच्या नागरिकांची वर्णी लागली आहे. यामध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई, मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, यात भर म्हणजे हल्लीच मेटाच्या AI टीममध्ये नव्या सदस्यांचा समावेश असून, यामध्ये कैक भारतीयांचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं.
जागतिक विचारसरणीवर ट्रम्प यांनी का केली टीका?
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या संम्मेलनामध्ये डोनाल्ड ट्रम्प काही मुद्द्यांवर अधिकच कठोर भूमिका घेताना दिसले. जिथं त्यांनी जागतिक स्तरावरील विचारसरणीला टीका केली. याच कारणास्तव कैक अमेरिकी नागरीक आणि अमेरिकी नागरिकांच्या कौशल्याला वाव मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उचलून धरत असा दावाही केला, जिथं बड्या कंपन्या नफ्याच्या उद्देशानं अमेरिकेत मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा फायदा घेत बाहेरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत.
चीन आणि भारताचं नाव घेत डोनाल्ड ट्रम्प असं नेमकं म्हणाले तरी काय?
अमेरिकेकडून मिळणारी मुभा पाहता बऱ्याच अमेरिकी कंपन्या चीनमध्ये त्यांच्या फॅक्ट्री आणि तत्सम प्लांट सुरू करत तिथं भारतीय कर्मचाऱ्यांना नोकरी देतात आणि आपल्याच देशातील नागरिकांना नाकारतात, त्यांच्यावर टीका करतात अशी बाब ट्रम्प यांनी प्रकाशात आणली आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
अमेरिका फर्स्ट… ट्रम्प पुन्हा जरा स्पष्टच बोलले!
जागतिक महासत्ता राष्ट्र असणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्या क्षणापासूनच ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ ही भूमिका प्रकर्षानं उचलून धरली आणि त्याचाच पुनरुच्चार त्यांनी या संम्मेलनादरम्यानही केला. देशाप्रती एकनिष्ठा दाखवा, आपल्याला अमेरिकी कंपन्यांची गरज असून त्या अमेरिकेतच राहिल्या पाहिजेत असं ते स्पष्टच म्हणत त्यांनी अमेरिकी नागरिकांनासुद्धा America First या तत्वानंच चालण्याचं आवाहन केलं.