महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३१ ऑगस्ट – अजय सिंग – नवीदिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. शहा यांना १८ ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथूनच ते आपला कार्यभार पाहत होते. उपचारानंतर ते बरे झाले असून त्यांना बारा दिवसांनंतर एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहा यांचा २ ऑगस्ट रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १४ ऑगस्टला त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ते गृहविलगीकरणात होते. पण त्यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. यामुळे पुन्हा त्यांना १८ ऑगस्ट रोजी पुढील उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
अमित शहा यांना कोरोना झाल्याचे २ ऑगस्ट रोजी स्पष्ट झाले होते. स्वतः शहा यांनी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर अमित शहा मेदांता रुग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळी शहा यांनी संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःला विलग करावे आणि कोरोनाची चाचणी करावी, असे आवाहन केले होते.