तुम्हाला यशस्वी व्हायचंय ? ;बिग बीं दिला यशस्वी होण्यासाठी मंत्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३१ ऑगस्ट – लक्ष्मण रोकडे – मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि सोशल मीडिया यांचे आता घट्ट नाते तयार झाले आहे. बिग बी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी त्यांच्या फॉलोअर्स सोबत शेअर करत असतात. अशातच त्यांची कोरोनासारख्या महाभयंकर आजारातून सुटका झालीय. आता मात्र, त्यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यातून ते चाहत्यांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र देताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर बिग बी प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. यावेळी ते एका ट्विटमुळे चर्चेत आहेत. या ट्विटद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांना यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोन मक्याचे कणीस दिसत आहेत. यामधील एक कणीस कच्चं आहे तर दुसरं भाजलेलं आहे. कच्च्या कणीसाची किंमत पाच रुपये आहे. तर भाजलेल्या कणीसाठी किंमत २० रुपये आहे. या फोटोचं उदाहरण देऊन बिग बींनी आपल्या चाहत्यांना यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला आहे. ‘जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर या मक्याच्या कणीसाप्रमाणे तुम्हाला मेहनतीच्या आगीत स्वत:ला झोकून द्यावं लागेल.’ अशा आशयाचं ट्विट बिग बींनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

https://twitter.com/SrBachchan/status/1299961824020840454?s=20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *