महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जुलै ।। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु होऊन वर्ष झाले आहे. आता लाडक्या बहिणींना १३वा हप्ता दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची वाट महिला पाहत आहेत. महिला संपला तरीही अजून याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे.
लाडकीच्या हप्त्यासाठी २९८४ कोटींचा निधी वर्ग (Ladki Bahin Yojana July 2984 Rupees funds Transfer)
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाने लाडकी बहीण योजनेसाठी निधी वर्ग केला आहे. काल ३० जुलै रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. यात जुलैच्या हप्त्यासाठी २९८४ कोटी रुपये वर्ग केले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यात जुलैचे पैसे जमा होऊ शकतात.
जुलैच्या हप्त्यासाठी निधी वर्ग केला असला तरीही आता ऑगस्टच्या हप्त्याचीही चर्चा सुरु झाली आहे. ऑगस्ट महिना सुरु झाला आहे त्यामुळे जुलै अन् ऑगस्टचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, रक्षाबंधनच्या दिवशी जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होऊ शकतात.
रक्षाबंधनला ३००० रुपये मिळणार (Ladki Bahin Yojana Installment Come On Rakshabandhan)
यंदा रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी आहे. हा सणदेखील बहिणींचा आहे. त्यामुळे या दिवशी सरकार महिलांना खुशखबर देऊ शकते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता रक्षाबंधनला दिला जाऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेतून तब्बल २६.३४ लाख महिलांना बाद करण्यात आली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी याबबत माहिती दिली आहे. या महिला निकषांमध्ये बसत नसल्याने त्यांचे अर्ज बाद केले आहेत. उर्वरित सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.