Donald Trump: आधी 25 टक्के टॅरिफ, आता 6 भारतीय कंपन्यांवर घातली बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जुलै ।। भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी देणाऱ्या अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ईरान आणि रशिया यांच्यासोबत पेट्रोकेमिकल व्यवहार करणाऱ्या 6 भारतीय कंपन्यांवर थेट बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याची अधिकृत घोषणा केली असून, यामुळे भारतातील पेट्रोकेमिकल उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे.

ट्रम्प प्रशासनाचा थेट इशारा
अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, या कंपन्यांनी अमेरिकेच्या निर्बंधांचा सरळसरळ भंग करत ईरानमधून पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांची खरेदी केली. यामुळे कार्यकारी आदेश E.O. 13846 अंतर्गत या भारतीय कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कंपन्यांची यादी
Alchemical Solutions Pvt Ltd
– या कंपनीने 2024 मध्ये एकट्यानेच 84 दशलक्ष डॉलरच्या ईराणी पेट्रोकेमिकल प्रॉडक्ट्सची खरेदी केली होती.

Global Industrial Chemicals Ltd
– या कंपनीवरही ईरानी प्रॉडक्ट्सच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.

Jupiter Dye Chem Pvt Ltd
– 2024 ते 2025 या काळात 49 दशलक्ष डॉलरहून अधिक किमतीचे टोल्यूनि व इतर रसायनांचे आयात व्यवहार या कंपनीने केले, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

Ramniklal S. Gosalia & Co.
– यांच्यावर मेथनॉल आणि टोल्यूनिसारख्या रसायनांची ईरानहून आयात केल्याचा आरोप असून, 22 दशलक्ष डॉलरहून अधिक व्यवहार यांच्याशी संबंधित आहेत.

Kanchan Polymers
– या कंपनीने तानाइस ट्रेडिंगमार्फत 1.3 दशलक्ष डॉलरहून अधिक किमतीचे पॉलीइथिलीन व इतर पदार्थ आयात केले.

एक अन्य कंपनीचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे, परंतु तीही ईरानी उत्पादनांच्या खरेदीत सक्रिय होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अमेरिका केवळ ईरान नव्हे, तर रशियाशी होणाऱ्या व्यापारावरही नाराज आहे. भारत जर रशियाकडून इंधन आयात करत राहिला, तर त्यावरही ‘सेकंडरी सॅन्क्शन्स’ म्हणजेच दुय्यम स्वरूपाची दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *