लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत यांची आज निर्दोष मुक्तता झाली

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी- मंगेश खंडाळे- लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत यांची आज निर्दोष मुक्तता झाली त्याबद्दल पतित पावन संघटनेतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार. व अभिनंदन. साहेबांसारख्या देशभक्ताला १० वर्षे तुरुंगात डांबून ठेवले व अनन्वित अत्याचार केले गेले, हे सर्व करणाऱ्या तत्कालीन UPA सरकारचा मी निषेध करतो. पहालगम हल्ल्याच्या विरोधात भारतीय लष्कर सेनेने सिंदूर ऑपरेशन केले त्याच्या विरोधात काँग्रेसने जे प्रश्नचिन्ह निर्माण केले त्यावरूनच हे समजते की काँग्रेस सरकारला भारत देशाप्रति अस्मिता काय आहे, राष्ट्रद्रोही पाताळयंत्री राजकारणी आणि त्यांचे लाळघोटेपणा करणाऱ्या काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचे हे षडयंत्र होते हे आता सिद्ध झाले आहे.

या सर्वांची नावे जगासमोर आणून त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवावा त्या साठी सरकारने SIT नेमावी व सत्यशोधन करावे अशी आमची मागणी आहे.
आमचा न्यायव्यवस्थेवर, संविधानावर, व साहेबांच्या निर्दोष असण्यावर मनापासून विश्वास होता आणि आज हा सोन्याचा दिवस उजाडला आहे, कर्नल पुरोहित साहेबांवरच्या खोट्या आरोपांमधून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
अस्तित्वात नसलेल्या हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद चा बागुलबुवा उभा करून हिंदू समाजाला बदनाम करण्याचा UPA सरकारचा कट होता. पण आज न्यायालयाने न्याय दिला आणि सगळ्या देशभक्तांना आनंदाची बातमी मिळाली आहे. असे संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्निल नाईक यांनी सांगितले त्यावेळी महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख श्री राजेश मोटे, कामगार महासंघाचे मयूर माने, रविंद्र भांडवलकर, यादव पुजारी, योगेश शिंदे, दिनेश कुसाळकर, राजेश मकवान, अजय घारे, स्वप्निल आंग्रे राजाभाऊ कारकुड, विजय क्षीरसागर, अजिंक्य गालिंदे अमृता देवकर, यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते
भारतमाता की जय!! वंदे मातरम !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *