‘मन की बात’ला लाखोने डिसलाईक्स का?

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – दि. १ सप्टेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्टला आपला रेडिओ कार्यक्रम मन की बातमधून देशाला संबोधित केले होते. मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्यूबवर युजर्सनी या व्हिडीओबाबत नाराजी व्यक्त केली आहे. युजर्सनी या व्हिडीओवर डिसलाईक्सचा पाऊसच पाडला आहे. लाईक्सच्या तुलनेत युट्यूबवर या कार्यक्रमाच्या व्हिडीओला लाखो डिसलाईक्स मिळाले आहेत.

पंतप्रधान मोदींच्या नावाने असलेल्या चॅनेलवर या व्हिडीओला अपलोड करण्यात आलेले आहे. बातमी लिहीपर्यंत या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास 1 लाख लोकांनी लाईक केले आहे. तर तब्बल 6 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी डिसलाईक्स केले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 25 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे.


कमेंट्समध्ये देखील युजर्सली आपली नाराजी व्यक्त करत आहे. परीक्षेच्या मुद्यावरून विद्यार्थी आपली नाराजी व्यक्त करत आहे. सरकार नीट-जेईई परीक्षा घेण्यावर ठाम आहे. याचाच विरोध म्हणून युजर्स एकप्रकारे या व्हिडीओ डिसलाईक करत आहेत व कमेंट्समध्ये नाराजी व्यक्त करत आहे.
एखाद्या व्हिडीओला डिसलाईक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील काही चित्रपटांच्या गाणी आणि ट्रेलरला देखील मोठ्या प्रमाणात डिसलाईक्स करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *