कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकडे ; आज देणार बाप्पाला निरोप,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – मुंबई – दि. १ सप्टेंबर – गेले सहा महिने जनजीवन विस्कळीत करणाऱ्या कोरोनारूपी संकटाचे विघ्न दूर करण्याचे साकडे घालत लाखो भाविक आपल्या लाडक्या गणरायाला मंगळवारी भावपूर्ण निरोप देणार आहेत. या वर्षी चौपाट्यांवर प्रवेश बंदी असल्याने, गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेचा २३ हजार कर्मचाऱ्यांचा ताफा ४४५ स्थळी सज्ज झाला आहे.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्र आणि फिरती विसर्जन स्थळांची व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नियमावलीनुसार मुंबईकरांनीगणेशोत्सव साध्या पद्धतीने व शांततेत साजरा केला. दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन प्राधान्याने कृत्रिम तलावांमध्ये भाविकांनी केले. मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी महापालिका सतर्क आहे. यासाठी १६८ कृत्रिम तलाव संख्या, १७० मूर्ती संकलन केंद्र , ३७ फिरती विसर्जन स्थळे तर ७० नैसर्गिक विसर्जन स्थळे तयार केली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिकारी-कर्मचारी यांची संख्या तिप्पट करण्यात आली आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जनास मनाई आहे. १ ते २ किमी. अंतरातील भक्तांना त्यांची मूर्ती नैसर्गिक विसर्जन स्थळावरील कर्मचाºयांकडे सोपवावी लागेल. कृत्रिम तलावालगत राहणाºया भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्थळांवर जाण्यास मनाई असल्याने कृत्रिम तलावाचा वापर लगतच्या भाविकांनी करणे बंधनकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *