महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑगस्ट ।। Air India : एअर इंडियाच्या AI2455 या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आणि खराब हवामानामुळे हे विमान चेन्नईमध्ये उतरवण्यात आलं. या विमानात खासदार केसी वेणुगोपाल, अडूर प्रकाश, के राधाकृष्णन, रॉबर्ट ब्रुस हे सगळे दिल्लीला जात होते. पण हे विमान तांत्रिक बिघाडामुळे चेन्नईत उतरवण्यात आलं. खासदार वेणुगोपाल यांनी या घटनेबाबत माहिती दिली.
केसी वेणुगोपाल काय म्हणाले?
आम्ही ज्या विमानात बसलो होतो त्यात प्रचंड प्रमाणात टर्बुलन्सचा सामना करावा लागला. त्यानंतर साधारण एक तासाने वैमानिकाने विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घो,णा केली आणि विमान चेन्नईत उतरवलं. पहिल्यांदा लँडिंग करत असताना एक धक्कादायक प्रसंग आला होता. कारण समोर आलेल्या माहितीनुसार तिथेच एक दुसरं विमान उपस्थित होतं. त्यामुळे वैमानिकाने तातडीने आमचं विमान लँड होतानाच पुन्हा आकाशाच्या दिशेने फिरवलं. त्यामुळे सगळ्या प्रवाशांचा जीव वाचला. तर दुसऱ्यांदा त्याने व्यवस्थित लँडिंग केलं.
आमचं नशीब बलवत्तर होतं आणि पायलटने प्रसंगावधान दाखवलं त्यामुळे आमचा जीव वाचला. पण प्रवाशांच्या बाबतीत अशी घटना घडायला नको. मी डीजीडीसीएला आवाहन करतो की या घटनेची तातडीने चौकशी करा. अशा प्रकारची घटना पुन्हा होता कामा नये यासाठी काळजी घ्या असंही वेणुगोपाल म्हणाले.