महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑगस्ट ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
अविचाराने वागून चालणार नाही. परिस्थितीनुरूप संयम बाळगावा. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. काही बदल त्रस्त करू शकतात. समस्या निराकरणाचे उपाय सापडतील.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
मुलांच्या आवडी निवडी पुरवाल. काही सवयी बदलून पहाव्यात. मेहनतीला पर्याय नाही. विलंबाने का होईना पण यश मिळेल. मनाप्रमाणे दिवस घालवाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
अवास्तव खरेदीचा मोह टाळावा. मन काहीसे सैरभैर राहील. समोरील प्रत्येक गोष्टीत रममाण व्हाल. आज प्रेमाची अनुभूति येईल. निराशा टाळून कामाला लागावे.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. आपली आकांक्षा पूर्ण होईल. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. समोर आलेली संधी ओळखावी.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
खर्चाचे प्रमाण लक्षात घ्यावे. जोडीदाराच्या वागण्याचा अचंबा वाटेल. धार्मिक कामात मन गुंतवाल. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. अनुभावातून धडा घ्याल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
सामाजिक बांधीलकी जपा. व्यावसायिक चढउताराकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. स्वत:च्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. नवीन अनुभावातून शिकाल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
अचानक धनलाभ संभवतो. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दुसर्यावर विसंबून राहू नका. कमिशन मधून चांगला लाभ होईल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
नातेवाईकांकडून सुखद बातमी मिळेल. आनंददायी दिवस राहील. भागीदारीतून चांगला लाभ होईल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. भावनिक घटना घडू शकतात.
धनु राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
घरगुती वातावरण संमिश्र राहील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामातून समाधान लाभेल. उगाचच मनात चिंतांना घर करू देऊ नका. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. प्रकृतीची हेळसांड करू नका. मनोरंजनाकडे अधिक कल राहील. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. कामाचा ताण जाणवू शकतो.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
सार्वजनिक बाबीत सहभाग घेऊ नका. दगदग व धावपळ होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील. खाण्यापिण्याची पथ्ये पळावीत. मेहनतीला पर्याय नाही.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
जोडीदाराच्या सहवासात रमाल. मनातील गैरसमज दूर होतील. आवडता छंद जोपासाल. मन प्रसन्न राहील. अति शिस्तीचा बडगा करू नका.