तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑगस्ट ।। बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात श्रवण महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच भाविकांची मोठी गर्दी आहे. बहागिरी पर्वताला प्रदक्षिणा मारल्यास विशेष फलप्राप्ती होत असल्याने दरवर्षी प्रमाणे यंदाही तिसऱ्या श्रवणी सोमवारच्या पूर्व संध्येला रविवारी नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून लाखो भाविक जैवकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत.

हिंदू संस्कृतीत श्रवण आणि मार्गशीर्ष या दोन महिन्यांत पूजा पाठ व इतर धार्मिक कार्य मोठ्या संख्येने केले जाते. श्रावण महिन्यात, विशेषतः सोमवारी, त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. तिसऱ्या श्रवणी सोमवारच्या पूर्वसंध्येला, म्हणजे रविवारी, भाविक दर्शनासाठी आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी येत असल्याने गर्दीत उत्तरोत्तर वाढ होत आहेत. सोमवारी लाखो भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. रविवारी सायंकाळपासून बससाठी नाशिकहून रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सात वाजेनंतर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीच्या पार्श्वभूमीवर रविवारी

एसटी महामंडळाकडून २७० अतिरिक्त बस; सिटी लिंककडून २२४ फेऱ्या
एसटी महामंडळातर्फ नाशिकहून श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी २७० अतिरिक्त बरोसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेघ, सिटी लिंकच्या यतीने रविवार १० ऑगस्ट व सोमवार ११ ऑगस्ट २०२५ असे सलग दोन दिवस या जादा बसेस सोडण्यात येत आहे. सद्यस्थितीत नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वरमार्गे निमाष्णी या मार्गावर एकूण २८ बरोस सोडण्यात येतात, त्यानुसार या २८ बसेसच्या माध्यमातून नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर ११२ फेल्या, तर त्र्यंबकेश्वर ते नाशिकरोड ११२ फेऱ्या अशा एकूण २२४ फेल्या नियमित चालविण्यात येत आहे.

दुपारी बारा वाजेपासून ते सोमवार रात्री नऊ वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहेत. सांबाळे येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *