ICICI नंतर आणखी एका बँकेचा ग्राहकांना मोठा धक्का, मिनिमम बॅलेंसचं लिमिट अडीचपट वाढवलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। आयसीआयसीआय बँकेनंतर आता आणखी एका बँकेने ग्राहकांना धक्का दिला आहे. आता एचडीएफसी बँकेनेदेखील किमान बॅलेंस वाढवण्याची घोषणा केली आहे. एचडीएफसी बँकेने सेव्हिंग अकाउंटवर किमान बॅलेंस वाढवण्याची घोषणा केली होती. आता तुम्हाला २५००० रुपये खात्यात ठेवणे अनिवार्य आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.

एचडीएफसी (HDFC Bank) बँकेने किमान बॅलेंसची लिमिट २५००० रुपये केली आहे.याआधी ही लिमिट १०,००० रुपये होते. हे नवीन नियम १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाले आहे. हे नियम १ ऑगस्टनंतर जे ग्राहक अकाउंट ओपन करतील त्यांना लागू होणार आहेत.

एचडीएफसी बँकेचा ग्राहकांना धक्का (HDFC Bank Increase Minimum Balance Limit)
आता १ ऑगस्ट २०२५ नंतर जे नवीन ग्राहक अकाउंट ओपन करतील त्यांना खात्यात किमान २५००० रुपये बॅलेंस ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा सेव्हिंग अकाउंटवर चार्ज कापला जाईल. हे नियम मेट्रो, अर्बन शहरांमध्ये लागू आहेत. याआधी मिनिमम बॅलेंसची लिमिट १०,००० रुपये होती. त्यानंतर आता ही लिमिट जवळपास अडीचपट वाढवण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेने तर किमान बॅलेंस ठेवण्याची रक्कम ५०,००० रुपये केली आहे. याआधी ही रक्कम १०,००० रुपये होती. जर तुमच्या अकाउंटमध्ये ५०,००० रुपये नसतील तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. एकीकडे सरकारी बँका किमान बॅलेंस ठेवण्याचा नियम रद्द करत आहेत तर दुसरीकडे प्रायव्हेट बँका आपला किमान बॅलेंस वाढवत आहेत. आयसीआयसीआय बँकेने तर मिनिमम बॅलेंसची लिमिट ५ पटीने वाढवली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *