महाराष्ट्र 24– इनर व्हील क्लब पिंपरी, नॉर्थ इंडियन परंपरेतील तेज आणि महाराष्ट्राच्या खास मंगळागौर सणाचा जल्लोष पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी पेहराव, पारंपरिक खेळ, गाणी आणि नृत्य यामुळे कार्यक्रमाला खास देखणेपणा लाभला.
या सोहळ्यास इंटरनॅशनल इनरव्हीलच्या मीडिया मॅनेजर स्मिता पिंगळे, डिस्ट्रिक्ट चेअरमन अशा देशपांडे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी दीपशिखा, पीडीसी मुक्ती पानसे, महालक्ष्मी कॅटरिंगच्या मालकीण चारुलता पुरोहित या मान्यवर विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
क्लब प्रेसिडेंट सविता इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आनंदिता मुखर्जी, नीलम मेहता, मधुर प्रधान, वृंदा आंबेकर, स्मिता टिळेकर, मनिषा समर्थ, वैशाली जैन, वैशाली शहा, संगीता देशपांडे, विनिता अरोरा, अनु सूद, शालिनी चोप्रा, हंसा मोहन, बेला अग्रवाल या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय साधला.
कार्यक्रमाला विशेष सहकार्य महालक्ष्मी कॅटरिंग, योगिनी फोटोग्राफी आणि शर्मिली यांचे लाभले.
या प्रसंगी नारायणगाव, तळेगाव, पुणे प्लॅटिनम, पुणे नॉर्थ, खोपोली यांसह विविध इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी हजेरी लावून मैत्रीचे धागे घट्ट केले. महिलांच्या एकत्रित सहभागामुळे तेज आणि मंगळागौरचा हा पारंपरिक मिलाफ अविस्मरणीय ठरला.