Maharashtra Weather Update: राज्यभरात पावसाचं जोरदार कमबॅक; मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑगस्ट ।। राज्यभरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार (Rain Update) कमबॅक केलं आहे. पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर मुंबई आणि मुंबई उपनगरात देखील पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यात हवामान विगाकडून वर्तविण्यात आली आहे. अशातच मुंबईच्या हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज आज (16 ऑगस्ट) खरा ठरतोय. काल रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, सध्या देखील पावसाचा जोर कायम आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. आज शहरभर ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे. मात्र पावसाचा वेग आणि त्याचा कालावधी किती राहतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे हवामान विभागाने 16-17 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाण्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी ‘ रेड अलर्ट’ जारी केला आहे. तर 16 ऑगस्ट रोजी रायगडसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. शुक्रवारी, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाण्यात आठवड्याच्या शेवटी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. परिणामी पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वत्र दाणादाण उडवली आहे. अंधेरीत देखील दमदार पाऊस झाल्याने अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर त्याचा परिणामी रेल्व आणि वाहतुकीवर देखील होऊ शकतो.

‘रेड अलर्ट’ जारी
पालघर, ठाणे आणि मुंबईसाठी शुक्रवारी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. तर पालघरमध्ये रविवारपासून पाऊस आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि तो 19 ऑगस्टपर्यंत राहील. पुढील मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट असलेल्या रायगड आणि रत्नागिरीमध्येही जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.तर 16 ऑगस्ट रोजी रायगडसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

विक्रोळीत मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
दरम्यान मुंबई उपनगरातील विक्रोळी परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर उर्वरित लोक जखमी झाले असून या जखमींना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुसळधार पावसाने तेरणा डॅम ओव्हरफ्लो
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने तेरणा डॅम ओव्हरप्लो झालाय. तेरणा डॅमवर लोक पर्यटनाला गर्दी करत आहेत. डॅमवरील अरुंद फुलांवर लोकांनी गर्दी केलीय. सुट्टी असल्यामुळे लोक कुटुंबासह पर्यटनाला येत आहेत. सोबतच तरुणांचीही गर्दी आहे. पाण्याचा प्रवाह मोठा आहे, मात्र प्रशासनाकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे याठिकाणी दिसून येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *