वाहन आणि लायसन्ससाठी आधार अन् मोबाईल अनिवार्य; जाणून घ्या लिंक करण्याची प्रोसेस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑगस्ट ।। ड्रायव्हिंग लायसन्स धारक आणि नोंदणीकृत वाहन मालकांना सारथी पोर्टलवर त्यांचे मोबाईल नंबर अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाहीये. मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरू झालीय. यासाठी तुम्हाला MoRTH parivahan.gov.in पोर्टलवर जावे लागेल. जिथे दोन लिंक्स दिल्या जातील. तुम्ही सर्व माहिती टप्प्याटप्प्याने भरून प्रक्रिया पूर्ण करू शकता.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वाहन मालक आणि परवाना धारकांना एक संदेश पाठवला जात आहे. आधार प्रमाणीकरण प्रक्रियेद्वारे तुमच्या नोंदणीकृत वाहनाचा मोबाईल नंबर लिंक करा, अपडेट करा आणि पडताळणी करा. यासाठी, तुम्हाला parivahan.gov.in ला भेट द्यावी लागेल आणि प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असा सूचना संदेशद्वारे देण्यात आलीय. पोर्टलवर वाहन आणि सारथी नावाचे दोन QR कोड देण्यात आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही मोबाईल आणि अपडेट करू शकता.

वाहन आरसीसाठी मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा?
सर्वप्रथम parivahan.gov.in या पोर्टलवर जा

येथे ‘वाहन’ नावाचा विभाग निवडा.

तुमचा वाहन नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांक प्रविष्ट करा.

तसेच नोंदणीची तारीख आणि वैधता भरा.

यानंतर, पडताळणी कोड टाकून प्रक्रिया पूर्ण करा.

ड्रायव्हिंग लायसन्स (DL) साठी मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा
यासाठी तुम्हाला पोर्टलवरील सारथी क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.

यानंतर, तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्ससह तुमची जन्मतारीख, राज्याचे नाव आणि कॅप्चा कोड यासारखी आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.

प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला खाली दाखवलेल्या सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

वर नमूद केलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचा मोबाईल नंबर आणि आधार तुमच्या वाहन किंवा ड्रायव्हिंग लायसन्सशी लिंक केला जाईल. यानंतर कोणत्याही सरकारी अपडेट किंवा सूचनेची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *