महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। Gold-Silver Price Today: सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, १७ ऑगस्ट २०२५ रोजी, रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १७ ऑगस्ट २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १००,३८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९२,०१५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ११५,००० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,१५० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९१,८५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १००,२०० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,८५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १००,२०० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,८५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १००,२०० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,८५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १००,२०० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)