‘कोडॅक’च्या फ्लॅशवर अंधार दाटला! 133 वर्षे जुनी कंपनी कर्जाच्या खाईत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। फोटोग्राफीच्या दुनियेत ‘कोडॅक’ एक असे नाव आहे, ज्याचा कॅमेरा घ्यावा असे प्रत्येकाला वाटायचे. सुरुवातीच्या काळात जेवढे कॅमेरे आले, तेवढे ‘कोडॅक’चे असायचे. ही 133 वर्षे जुनी कंपनी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. ईस्टमॅन कोडॅकने आपल्या गुंतवणूकदारांना जास्त काळ टिकणे कठीण असल्याचे सांगितलेय. कंपनीने आपल्या अर्निंग रिपोर्टमध्ये, आपल्यावर 50 कोटी डॉलर्सचे कर्ज आहे, परंतु त्यासाठी आपल्याकडे रोख रक्कम नाही असे म्हटलेय.

कंपनीची स्थापना 1982 मध्ये ईस्टमॅन कोडॅक कंपनी या नावाने झाली, पण त्याचा इतिहास 1879 मध्ये सुरू झाला जेव्हा जॉर्ज ईस्टमॅनला प्लेट कोटिंग मशीनचे पेटंट मिळाले. 1888 मध्ये कंपनीने आपला पहिला कॅमेरा 25 डॉलरला विकला. त्याचे नाव ‘द कोडॅक पॅमेरा’ असे ठेवले.
100 वर्षे या कंपनीने कॅमेरे आणि फिल्म निर्मितीवर वर्चस्व गाजवले. 1970 च्या दशकात अमेरिकेत विकले जाणारे 90 टक्के चित्रपट आणि 85 टक्के कॅमेरे याच कंपनीचे होते.

का बुडाली कंपनी?
1975 मध्ये कोडॅकने पहिला डिजिटल कॅमेरा लाँच केला, पण हेच तंत्रज्ञान त्यांना घेऊन बुडाले. यात सुधारणा करून इतर कंपन्यांनी कोडॅकला मागे टाकले. त्यानंतर तर मोबाईल कॅमेऱ्यात फोचो काढण्याचा जमाना आला. 2021 मध्ये कंपनीने दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला होता. त्या वेळी कंपनीवर एक लाख लोकांचे कर्ज होते. ज्याचे एकूण मूल्य 6.75 अब्ज डॉलर होते. कंपनीकडे आता 500 दशलक्ष डॉलरचे कर्ज चुकवायला पैसे नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *