Asia Cup 2025: आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर! बाबर आझम- मोहम्मद रिझवानची हाकलपट्टी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। आगामी आशिया चषक २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप २०२५ स्पर्धा पाहता ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघाची जबाबदारी सलमान अली आगाकडे सोपवण्यात आली आहे. तर संघातील अनुभवी फलंदाज बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांची सुट्टी करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनुभवी खेळाडूंना बाहेर ठेवून युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. या संघात सलमान मिर्झा, सुफियान मुकीम आणि हसन नवाज यांना स्थान दिलं आहे. पाकिस्तानला वेस्टइंडिजविरूद्ध झालेल्या टी-२० मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. वेस्टइंडिजविरूद्ध खेळताना हसन नवाजने दमदार कामगिरी केली होती. तर वरिष्ठ खेळाडू म्हणून हॅरीस रऊफ, शाहीन आफ्रिदी, फखर जमान यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मोहम्मद रिझवानऐवजी मोहम्मद हॅरीसला संघात स्थान दिलं गेलं आहे.

आशिया चषक स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेआधी पाकिस्तानचा संघ २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान अफगाणिस्तान आणि यूएईविरूद्ध तिरंगी मालिका खेळणार आहे. या स्पर्धेत १४ सप्टेंबरला भारतीय संघाचा सामना पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. मात्र, भारतीय संघ पाकिस्तानसोबत खेळणार की नाही हे अजूनही कळू शकलेलं नाही. पाकिस्तानचा पहिला सामना १२ सप्टेंबरला ओमानविरूद्ध होणार आहे.

आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी असा आहे पाकिस्तानचा संघ:
मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर झमान, हरिस रउफ, हसन अली, हसन नवाज,मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, शाहीन शाह आफ्रिदी, सुफयान मुकीम, सॅम मिर्झा अयुब, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज आणि सलमान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *