‘हे’ युवा खेळाडू! पदार्पणातच गाजवणार IPL

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – अजय सिंग – दि. २ सप्टेंबर – नवीदिल्ली – यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम दुबई, अबुधाबी आणि शारजाहला होणार आहे. 19 सप्टेंबरला पहिला सामना होणार असून 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 डबल हेडर्स सामने असणार आहे.यावेळी झालेल्या आयपीएलच्या लिलावात सर्व खेळाडूंनी जास्तीत जास्त युवा खेळाडूंना आपल्या संघात सामिल केले. मात्र यातील हे खेळाडू आयपीएल स्पर्धा गाजणार असे दिसत आहे. त्यामुळे विराट, रोहित आणि धोनीला ही युवा ब्रिगेड चांगलीच टक्कर देऊ शकते.

यंदा आयपीएलमध्ये सर्वांची नजर आहे ती पुणेकर ऋतुराज गायकवाड दर्जेदार युवा खेळाडूंपैकी एक आहे. ऋतुराजला कोरोनाची लागण झाली असली तरी तो फिट झाल्यावर आयपीएल खेळू शकणार की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही आहे. मात्र या 23 वर्षीय फलंदाजानं महाराष्ट्राला अनेक सामने जिंकून दिले आहेत.

मुंबईच्या यशस्वी जयस्वालवर. गेल्या वर्षी झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत यशस्वीनं जबरदस्त कामगिरी केली होती. आयपीएल लिलावात यशस्वीला राजस्थान संघाने (Rajasthan Royals) 2.4 कोटींना विकत घेतले. त्याच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा आहे.

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्वात चर्चेत आलेला गोलंदाज म्हणजे रवी बिश्नोई. वर्ल्ड कपमध्ये त्यानं 17 विकेट घेतल्या होत्या. बिश्नोईला किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) संघाने 2 कोटींना विकत घेतले. त्यामुळे बिश्नोईची गोलंदाजी रोहित-विराटला नक्कीच त्रासदायक ठरेल.

कमलेश नागरकोटीला 2018 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये आपल्या जलद गोलंदाजीमुळे संघात स्थान मिळाले होते. मात्र दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही. आता कमलेश नागरकोटी कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळेल. कमलेश उत्तम गोलंदाजाबरोबर चांगला फिल्डरही आहे.

2018 अंडर वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा इशान पोरेलही या यादीत आहे. इशान आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळेल. या युवा गोलंदाजानं आपल्या संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.

देवदत्त पड्डीकल हा खेळाडू विजय हजारे आणि सैयद मुश्ताक ट्रॉफीमुळे चर्चेत आला. देवदत्त यावर्षी आयपीएलमध्ये रॉलय चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळेल. आपल्या जबरदस्त फलंदाजीसाठी देवदत्त ओळखला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *