एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर सावधान! ‘हे’ आहे कारण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – दि. २ सप्टेंबर – पुणे – विविध बँकेमध्ये काही लोकांची अनेक खाती असतात. मात्र कोणतेही कारण नसताना अनेक बँकांमध्ये खातं उघडलं असल्यास (Multiple Bank Account) ते महागात पडण्याची शक्यता आहे. असं असल्यास संबंधित व्यक्ती ही आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकते. जर एखादं खातं वापरत नसाल तर ते बंद करणं गरजेचं आहे. कारण आयकर विभागाची सर्व गोष्टींवर नजर असते. ते अशा खात्यांची तपासणी करत असतात.

काळा पैसा पांढरा करण्यासाठी (Money Laundering) अशाप्रकारे अनेक खाती उघडल्याचा समज आयकर विभागाकडून केला जाऊ शकतो. कोणत्याही व्यक्तीला कितीही बँकांमध्ये खाते उघडण्यास मनाई करेल असा कोणताही कायदा देशामध्ये नाही. मात्र आयकर विभागाची नजर सर्वच गोष्टींवर असते. त्यामुळे अशाप्रकारे अनेक बँकेत खाती असल्यास त्याला डमी खातं समजलं जाऊ शकतं. एखाद्या खोट्या कंपनीशी ते खाते संबंधित नाही ना असा तपास केला जाऊ शकतो.

अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता बँकांकडून नियमित स्वरुपात सर्व सूचना आयकर विभागाकडे दिल्या जात आहेत. कोणती व्यक्ती मोठ्या रकमेचे ट्रान्झॅक्शन करते आहे, याबाबत बँकेकडून आयकर विभागास माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे एकाच पॅन नंबरवर किती खाती आहेत, याची माहिती देखील एका क्लिकवर मिळू शकते. जर एखादी व्यक्ती वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते उघडत असेल तर ते संशयास्पद ठरू शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *