राज्यात पावसाचा जोर ओसरला : पण ‘या’ 10 जिल्ह्याना हवामान विभागाचा अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑगस्ट ।। राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मुंबईसह उपनगरात पावसाने उसंत घेतली असली तर राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर, सांगली येथे पुराचा धोका टळला असला तरी पंढरपुरात अद्यापही नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. विदर्भातही विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कमी दाबाचा पट्टा सूरतगड, रोहतक, फतेहगड, गया, दिघा ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळला असून बंगालच्या उपसागरात सोमवारपर्यंत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

राज्यात मान्सूनचा जोर ओसरला आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी लावली आहे. आज पूर्व विदर्भात पाऊस हजेरी लावू शकतो. बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पाऊस बरसू शकतो. हवामान विभागाने या भागात यलो अलर्ट जारी केला आहे. तर, उर्वरित राज्यात ढगाळ हवामान राहिल तसंच, हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, पंढरपूर येथील पुराचा धोका टळला आहे. उजनी आणि वीर धरणातून भीमा आणि नीरा नदीत सोडलेल्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी केला.उजनी धरणातून 30 हजार तर वीर धरणातून 15 हजार क्युसेक पर्यंत कमी झाला. आज दुपार नंतर पंढरपूर मधील भीमा नदीची पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *