महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। प्रत्येकाचे बँक अकाउंट असते. बँक अकाउंटमध्ये प्रत्येकाचे पैसे असतात. बँकेत पैसे ठेवणे हे सुरक्षित असते. परंतु तुम्ही बँकेत किती पैसे ठेवू शकतात आणि किती पैसे ठेवणे सुरक्षित असतात हे जाणून घ्या. जर तुम्ही ज्या बँकेत पैसे ठेवले ते बँक दिवाळखोरीत निघाली तर तुमचे काही ठरावीक पैसे सुरक्षित असतात. त्यातील काही पैसे हे असुरक्षित असतात.
सामान्यतः बँका दिवाळखोरीत निघत नाही. परंतु जर चुकून अशी घटना घडली तर तुमचे पैसे असुरक्षित होऊ शकतात.बँकेत ठेवलेले पैसे नेहमीच सुरक्षित नसतात. जर बँकेत चोरी, दरोडा घातला तर बँक तुमच्या पैशांची हमी देत नाही. या परिस्थितीत तुमचे पैसे कोण परत करणार असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. दरम्यान, तुमच्या खात्यात कितीही रक्कम असेल तर निर्धारित मर्यादेपर्यंतच पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त पैसे असतील तर त्याची सुरक्षितता नसते.
डिपॉझिट इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अॅक्ट १९६१ १६ (१)अंतर्गत बँकेत जर तुम्ही पैसे जमा केले तर त्यावर फक्त ५ लाखांपर्यंत हमी मिळते. जर तुम्ही ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर त्यावर कोणतीही हमी दिली जात नाही. त्यामुळे कदाचित तुमचे पैसे बुडू शकतात.
फक्त ५ लाखांची गॅरंटी (Bank Give Guarantee on 5 lakh)
बँक तुम्हाला ५ लाखांपर्यंत गॅरंटी देते. ही रक्कम तुमच्या डिपॉझिट अकाउंटसाठी आहे.दरम्यान, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट आणि एफडीमधील एकत्रित रक्कमेवर ५ लाख रुपयांपर्यंत हमी दिली जाते. जर तुमचे वेगवेगळ्या खात्यात पैसे असतील तर बँक तुम्हाला ५ लाखांर्यंत पैसे परत मिळतील.
किती दिवसात मिळते रक्कम?
बँक दिवाळखोर झाली तर तुम्हाला डीआयसीजीसी ४५ दिवसांत ग्राहकांच्या खात्याची सर्व माहिती गोळा करते. त्यानंतर ही रक्कम ४५ दिवसांत ग्राहकाला दिली जाते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ९० दिवस लागतात.