Ladki Bahin Yojana: लाडकीचा ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यात आता ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही लाडकीच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

लाडकीचा हप्ता लांबणीवर? (Ladki Bahin Yojana Installment To be Delayed)
ऑगस्ट महिना संपायला अवघे ६ दिवस उरले आहेत. अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे लाडकीचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित महिनाअखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. जर महिनाअखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर पुढच्या महिन्यात पैसे दिले जातील.

मागील अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकेक महिला पुढे जात आहे. त्यामुळे या महिन्यातदेखील हप्ता पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हप्ता लांबणीवर गेला तर पुढच्या महिन्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्नदेखील विचारला जात आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही असा करा चेक (Ladki Bahin Yojana Installment Recieve or not)

लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा केला जाणार, याबाबत स्वतः मंत्री आदिती तटकरे देतात. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. दरम्यान तुमच्या खात्यात जमा झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल. तसेच तुम्ही बँकेच्या अधिकृत अॅपवर जाऊनदेखील पैसे जमा झाले की नाही हे चेक करु शकतात. तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये पैसे जमा झाले की नाही हे समजेल. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊनदेखील पैसे जमा झाले की नाही हे चेक करु शकतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *