महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ ऑगस्ट ।। गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस. सर्वत्र उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण. गणेश चतुर्थीनिमित्त अनेक जण नवनवीन गोष्टी खरेदी करतात. तसेच काहीजण सोनंही खरेदी करतात. पण ऐन सणाच्या दिवशी सोनं महागलं आहे. गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी प्रति तोळ्यामागे ३८० रूपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, आजही सोन्याचा भाव चढताच आहे. २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळ्यामागे किती रूपयांची वाढ झाली आहे, पाहुयात.
काही दिवसांत गौराईंचं आगमान होईल. गौरीसाठी आपण सोनं खरेदी करतो. परंतु सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. आज २८ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट प्रति तोळा सोन्यामागे १६० रूपयांची वाढ झाली आहे. तर, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्यामागे १५० रूपयांची वाढ झाली आहे.
२४ कॅरेट १० ग्रॅम सोनं १६० रूपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला १,०२,६०० रूपये मोजावे लागतील. तर, १०० ग्रॅम सोनं १,६०० रुपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला १०,२६,००० रूपये मोजावे लागतील. ऐन सणावाराला सोनं महागल्यामुळे सामान्यांना याची झळ बसत आहे.
२२ कॅरेट १० ग्रॅम सोनं १५० रूपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला ९४,०५० मोजावे लागतील. तर, १०० ग्रॅम सोनं १,५०० रूपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला ९,४०,५०० रूपये मोजावे लागतील.
१८ कॅरेट १० ग्रॅम सोनं १२० रूपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला ७६,९५० रूपये मोजावे लागतील. तर, १०० ग्रॅम सोनं १,२०० रूपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला ७,६९,५०० रूपये मोजावे लागतील.