Maharashtra Weather News : राज्यात जोरदार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांसठी सावधगिरीचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसानं जोर धकण्यास सुरुवात केली आणि हा पाऊस पाहता पाहता विदर्भ, मराठवाड्यामध्येही जोर धरताना दिसला. पुढील 24 तासांमध्येसुद्धा चित्र फारसं बदलणार नसून पावसाचा जोर बहुतांश भागांमध्ये कायम राहणार आहे.

हवामान विभागाच्या मुंबई शाखेच्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्रासह कोकणातील बहुतांश जिल्हे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तिथं मराठवाड्यात मेघगर्जनेसह ताशी 40 ते 50 किमी इतक्या वाऱ्याच्या वेगात पावसाची हजेरी पाहायसा मिळेल. जिथं पाऊस नव्हे, तर सोसाट्याचा वारा अडचणी वाढवताना दिसेल.

प्रामुख्यानं पुढील 24 तासांमध्ये सातारा, कोल्हापूर, पुणे यांसारख्या भागांमध्ये असणाऱ्या घाट क्षेत्रामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी असेल. पावसाळी ढगांमुळं या भागांमध्ये दृश्यमानता कमी असल्यानं यामुळं वाहतूक प्रभावित होईल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्येसुद्धा पावसाची रिपरिप सुरूच राहणार असून अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी नागरिकांच्या अडचणींमध्ये भर टाकताना दिसतणार आहेत. एकंदरत विदर्भ मराठवाड्यापासून कोकण, मुंबईपर्यंत हा पाऊसच कमीजास्त प्रमाणात हजेरी लावताना दिसणार आहे.

परतीच्या पावसाला सुरुवात?
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान्या काळात गुजरात आणि राजस्थानवर निर्माण होणारी वाऱ्याची स्थिती पाहता परतीच्या पावसास सुरुवात होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं आता जरी त्रासदायक ठरत असला तरीही हा पाऊस यंदाच्या वर्षासाठी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *