सोने आणि चांदी भाव वाढले ; कमॉडिटी बाजारात मागणी वाढली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३ सप्टेंबर – आठवडाभरापासून दबावात असलेल्या सोने आणि चांदीने आज गुरुवारी सकारात्मक सुरुवात केली आहे. सोन्याच्या किमतीत सध्या ७५ रुपयांची वाढ झाली असून दहा ग्रॅमचा दर ५०८९६ रुपये झाला आहे. चांदीचा भाव ३६६ रुपयांनी वाढला असून एक किलोला ६८६२० रुपये झाला आहे.

स्थानिक सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या किमतीत सरासरी एक टक्का घसरण झाली. सोन्याचा भाव ५१०५ रुपयांवर बंद झाला. अमेरिकेतील सकारात्मक आर्थिक आकडेवारी आणि भांडवली बाजारातील तेजीने सोने आणि चांदीच्या मागणीवर परिणाम झाल्याचे कमॉडिटी विश्लेषकांनी सांगितले. काल मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने ४३५ रुपयांनी घसरले आणि ५१०६७ रुपयांवर बंद झाले होते.

जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रती औंस १.४९ टक्क्यांनी कमी होऊन १९४९.५० डॉलर झाला. बुधवारी तो १९४६.७० डॉलर होता. ऑगस्टमध्ये सोन्याने २०८९.२० डॉलरचा विक्रमी स्तर गाठला होता. त्यात आतापर्यंत ७ टक्के घसरण झाली आहे.

शेअर बाजार ; अनिश्चिततेचे सावट आणि तेजी-मंदी
गेल्या पंधरवड्यात सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाली आहे. उच्चांकी दरामुळे सोन्याच्या मागणीत घसरण झाली असून कमॉडिटी बाजारात मोठी उलथापालथ होत आहे. त्यामुळे सोन्याचे बडे साठेबाज, सराफ व्यापारी आणि ट्रेडर्स चिंतेत आहे. काहींनी सोन्याचा साठा कमी करण्यासाठी मोठी सवलत देणे सुरु केले आहे. यामुळं बाजारात सोन्यावरील सवलतीचे प्रमाण ५ महिन्यांच्या उच्चांकवर गेले आहे. गोल्ड डिस्काउंट प्रती औंस तब्बल ४३ डॉलर म्हणजे ३२०० रुपयांवर गेला आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यात सोन्याचं किमतीत जवळपास पाच हजारांची घसरण झाली आणि डिस्काउंट दुप्पट झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

रिझर्व्ह बँकेने या वेळी सोन्याच्या बाँडच्या किमती प्रती ग्रॅमसाठी ५ हजार ११७ इतकी निश्चित केली आहे. या बाँडची खरेदी करताना जर तुम्ही डिजीटल पैसे जमा केले तर ५० रुपये सवलत दिली गेली आहे. ज्यामुळे नागरिकांना बाँड ५ हजार ०६७ रुपयांना मिळेल. ही योजना ३१ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे आणि ती ४ सप्टेंबरपर्यंत सुरू असेल. या काळात तुम्ही सोन्याची खरेदी करू शकता. तुम्ही कमीत कमी एक ग्रॅमपर्यंत सोन्याची खरेदी करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *