दिग्गज गोलंदाजानं IPLमधून घेतली माघार ; मुंबई इंडियन्सला धक्का

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३ सप्टेंबर – आयपीएल 2020 (IPL 2020) तेराव्या हंगामाला दोन आठवडे शिल्लक असताना खेळाडू माघार घेण्याचा प्रकार सुरूच आहे. याआधी चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा फलंदाज सुरेश रैनानं आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे.

मलिंगानं माघार घेतल्यानंतर मुंबई संघाला मोठा झटका बसणार आहे. मलिंगानं गेल्या हंगामात जबरदस्त गोलंदाजी करत संघाला चॅम्पियन केले होते. आता मलिंगाने माघार घेतल्यानंतर जेम्स पॅटिंसनला (James Pattinson) संधी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी सांगितले की, ” जेम्स पॅटिंसन आमच्यासाठी योग्य खेळाडू आहे. त्याच्यामुळे आमची गोलंदाजी चांगली होईल. लसिथ मलिंगा मुंबईती ताकद आहे, यात काही वाद नाही. त्याची कमी आम्हाला नक्की जाणवेल. पण मलिंगाला परिवारासोबत राहायचे आहे, हे आम्ही समजू शकतो”. याआधी मलिंगा 2 आठवडे आयपीएल खेळणार नाही, अशा बातम्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *